PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा

'मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह'ला करणार संबोधित
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर

  • 'इंडिया मेरीटाईम वीक 2025' कार्यक्रमाला लावणार हजेरी

  • 'मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह'ला करणार संबोधित

(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदी गोरेवमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित 'इंडिया मेरीटाईम वीक2025' या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

'मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह'ला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. आज दुपारी 4:00 वाजता पंतप्रधान मोदी गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित 'इंडिया मेरीटाईम वीक (IMW)2025' मध्ये 'मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह'ला संबोधित करतील.

'इंडिया मेरीटाईम वीक' या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे उद्घाटन सोमवारी 24 ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झालं होत. ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षस्थान देखील पंतप्रधान भूषवतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com