Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो 3 लाईनच्या प्रवाशांच्या अडचणी संपेना
थोडक्यात
भूमीगत मेट्रो 3 पूर्ण क्षमतेने सुरू
पहिल्याच दिवशी दीड लाख प्रवाशांनी केला प्रवास
मुंबई मेट्रो 3 लाईनच्या प्रवाशांना आता अनेक अडचणी
(Mumbai Metro 3 ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मुंबई मेट्रो-3 मार्गिकेचं उद्घाटन झालं. अॅक्वा लाईनची आरे जेव्हीएलआर ते कफ परेड अशी सेवा गुरुवारपासून सुरू झाली. सकाळी 5.55 वाजता सुरू झालेली मेट्रो 3 ही रात्री 10.30 पर्यंत सुरू राहणार आहे.
मुंबई मेट्रो ३ ला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. भूमीगत मेट्रो ३ पूर्ण मार्गावर सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी दीड लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. मात्र आता अनेक समस्या प्रवाशांना होत आहेत.
प्रवाशांना व्यवस्थित नेटवर्क मिळत नाही, नेटवर्क नसल्याने कोणाला फोन देखील करु शकत नाही. प्रवाशांनी UPI पेमेंट करण्यास, ऑनलाइन तिकिटे बुक करताना अडचण येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणं आहे. मुंबईच्या पहिल्या पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गावर प्रवाशांच्या सोयीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.