Mumbai Rain : नववर्षाचा पहिलाच दिवस मुंबईकरांसाठी पावसाचा; पहाटेपासूनच पावसाच्या धारा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Mumbai Rain) सरत्या वर्षाला निरोप देत संपूर्ण देश नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. राज्यात सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे.
आतषबाजी करत सरत्या वर्षाच्या आठवणींना निरोप देत सर्वांनी नववर्षाचे स्वागत केलं. यातच नववर्षाच्या पहिलाच दिवस मुंबईकरांसाठी पावसाचा असल्याचे पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई शहरात पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या या पावसाने सर्वांची धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले.
ऐन थंडीत जोरदार पावसाच्या सरी पडत असून नववर्षाचे स्वागत पावसाने झाले आहे. मुंबईत पहाटे पावसाने हजेरी लावली असून भांडूप, घाटकोपर,अंधेरी परिसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या.
Summary
मुंबईत नव्या वर्षाची पावसाने सुरुवात
पहिल्याच दिवशी मुंबईत पहाटे पावसाची हजेरी
भांडूप, घाटकोपर,अंधेरी परिसरात हलक्या पावसाच्या धारा
