Rain Update
मुंबई
Rain Update : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय; मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
(Rain Update ) गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.
काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.