Rajool Patil : राजोल पाटील निवडणुकीच्या मैदानात; भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 114 मधून उमेदवारी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rajool Patil) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
यातच राजोल पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 114 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजोल पाटील यांच्या प्रचाराकारता मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी अमित ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मिळून राजोल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथे मशाल निवडणूक चिन्ह आहे आणि मशालच जिंकणार. असे अमित ठाकरे म्हणाले.
Summary
राजोल पाटील निवडणुकीच्या मैदानात
भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 114 मधून उमेदवारी
प्रचाराकारता मनसे नेते अमित ठाकरेंची उपस्थिती
