Mumbai : निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून 9 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Mumbai ) मुंबईतील बोरिवली पूर्व परिसरामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून 9 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
संध्याकाळी सातच्या सुमरास शेजारी राहणारी लहान मुलगी लिफ्ट मधून घरी जाण्यासाठी निघाली असता त्याच दरम्यान निवृत्त पोलीस अधिकारी यांनी लिफ्ट मध्ये चिमुरडीला ओढलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
ही सर्व घटना लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. मुलीने आईला जाऊन सर्व घटना सांगितली त्यानंतर आईने कस्तुरबा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल घेत कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.अटक केल्यानंतर आरोपीला पोलिसांनी बोरिवली कोर्टात हजर केले असता कोर्टामधून आरोपी ला 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
Summery
मुंबईतील बोरिवली पूर्व परिसरामधून धक्कादायक घटना समोर आली आहे
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून 9 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
आरोपीला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
