Navi Mumbai
Navi Mumbai

Navi Mumbai : तुम्ही उंदरांनी चाखलेलं आईस्क्रिम खाताय? नवी मुंबईत मॉलमधील किळसवाणा प्रकार VIDEO

नवी मुंबईतून हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Navi Mumbai) नवी मुंबईतून हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहेत. एका प्रसिद्ध मॉलमधील आईस्क्रीम दुकानात उंदीर खुलेआम आईस्क्रीम खाताना दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नवी मुंबईतील सीवूड्स परिसरातील एका नामांकित मॉलमध्ये ही घटना घडली. मॉलमधील एका आईस्क्रीम आउटलेटमध्ये उंदरांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, दुकानाच्या टेबलावर ठेवलेल्या आईस्क्रीम कोनकडे उंदीर चढतो आणि थेट आईस्क्रीम खातो. तसेच काही उंदीर आईस्क्रीम मशिनच्या जवळ फिरताना दिसत आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे मत व्यक्त होत आहे.

"अशा ठिकाणी लहान मुले आणि कुटुंबीय आईस्क्रीम खायला येतात. त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात," अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई करून संबंधित दुकानावर दंडात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com