Bandra : वांद्रेमधील मेडिकल स्टोअरमधील धक्कादायक प्रकार; आईस्क्रीममध्ये आढळले किडे

वांद्रेमधील मेडिकल स्टोअरमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

( Bandra) वांद्रेमधील मेडिकल स्टोअरमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वांद्रे पूर्वेतील एका मेडिकल स्टोअरच्या आईस्क्रीममध्ये किडे आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. काल रात्री एक ग्राहक आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये गेला असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे स्थानिक लोक संतापले आहेत.

ग्राहकाचा आरोप आहे की, मेडिकल स्टोअरमध्ये विकल्या जाणाऱ्या आईस्क्रीमला एक्सपायरी डेट नाही आणि हे उत्पादन खुलेआम विकले जात आहे. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित दुकानाविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासन कडून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. स्थानिक लोकांनी या संदर्भात लेखी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com