Taj Hotel Video
Taj Hotel Video

Taj Hotel Video : ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्याने वाद; तरुणीने केला व्हिडीओ शेअर, म्हणाली...

जगभरात प्रसिद्ध असलेले ताज हॉटेल आता चांगलेच चर्चेत आले आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • जगभरात प्रसिद्ध असलेले ताज हॉटेल आता चांगलेच चर्चेत आले आहे

  • ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्याने वाद

  • तरुणीने केला व्हिडीओ शेअर

(Taj Hotel Video )जगभरात प्रसिद्ध असलेले ताज हॉटेल आता चांगलेच चर्चेत आले आहे. अनेकजण जेवणासाठी तिथे जात असतात मात्र यावेळी तिथे गेलेल्या तरुणीसोबत एक अजब प्रकार घडला. ताज हॉटेलमध्ये एक तरुणी जेवणासाठी गेली होती.

ती ताज हॉटेलच्या टेबलवर जेवताना मांडी घालून बसली. मात्र ताज हॉटेलच्या मॅनेजरने येऊन ही योग्य बसण्याची योग्य पद्धत नाही असे त्या तरुणीला सांगितले. तुमच्या अशा बसण्याच्या पद्धतीवर इतरांनी आक्षेप नोंदवला असल्याचे त्या मॅनेजरने श्रद्धा शर्मा यांना सांगितले. याच पार्श्वभूमीवर आता श्रद्धा शर्मा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा ताज हॉटेलमधील व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत आला आहे.

आज एक सामान्य व्यक्ती मेहनत करतो, कष्टाने पैसे कमवतो आणि ताज हॉटेलमध्ये जेवायला येतो. मात्र तरीदेखील सामान्य माणसाला अपमानित केले जाते. माझी चूक काय आहे? मी मांडी घालून जेवायला बसले ही माझी चुक आहे का? ताज मला शिकवतोय की कसे बसायचे आणि काय करायचे? असे म्हणत श्रद्धा शर्मा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

‘यूअरस्टोरी’च्या संस्थापक आणि CEO श्रद्धा शर्मा यांनी ताज हॉटेलच्या अधिकाऱ्यांवर मांडी घालून बसल्यामुळे अपमानित केल्याचा आरोप केला आहे. श्रद्धा शर्मा यांच्या या व्हिडिओवर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com