Byculla Rani Baug : भायखळ्याच्या राणी बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Byculla Rani Baug) भायखळ्याच्या राणी बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्राणिसंग्रहालयात 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणिसंग्रहालयातून 'शक्ती' वाघ आणण्यात आला असून तो आता तो दहा वर्षांचा होता.
उद्यान प्रशासनाने केलेल्या नैसर्गिक अधिवासात तो राहत होता.या वाघाला अपस्माराचे झटके आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज उद्यान प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 17 नोव्हेंबरला वाघाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने आणि नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाघाच्या मृत्यूची माहिती आठ दिवस जाहीर करण्यात आली नसल्याने उद्यान व्यवस्थापनाकडून त्याची नीट देखभाल करण्यात आली नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Summery
भायखळ्याच्या राणी बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू
2020 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणिसंग्रहालयातून 'शक्ती' वाघ आणण्यात आला होता
उद्यान प्रशासनाने केलेल्या नैसर्गिक अधिवासात तो राहत होता
