Mumbai Coastal Road Car Accident
मुंबई
Mumbai Coastal Road Car Accident : मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात; कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समुद्रात
कारचा अपघात होऊन कार थेट समुद्रात
थोडक्यात
मुंबईच्या वरळी कोस्टल पुलावर अपघात
कारचा अपघात होऊन कार थेट समुद्रात
वरळीवरुन वांद्र्याला जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवर अपघात
(Mumbai Coastal Road Car Accident ) मुंबईच्या वरळी कोस्टल पुलावर अपघात झाला. भरधाव कार पुलावरून थेट समुद्रात कोसळल्याची घटना घडली.
वरळीवरून बांद्राला जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवर कारचा अचानक नियंत्रण सुटल्याने पुलाची रेलिंग तोडून चालक गाडी सोबत समुद्राच्या पाण्यात गेला . कारमध्ये चालक एकटाच असल्याची माहिती मिळत आहे. हे दृश्य पाहून तिथे तैनात असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत चालकाचे प्राण वाचवले.
पाण्यात खोलात जाऊन सुरक्षा जवानांनी चालकला रस्सीच्या मदतीने बाहेर काढले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून पोलीस आता अधिक तपास करत आहेत.