Mumbai : ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसैनिकांनी मिळून संशयित पैसे वाटप करणारी गाडी पकडली; मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळील प्रकार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai ) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. आज संध्याकाळी 5.30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे.
जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. विविध ठिकाणी पैशांचे वाटप करण्यात आल्याचा एकमेकांवर आरोप करण्यात येत आहे. यातच आता शिंदेंच्या शिवसैनिकांनी संशयित पैसे वाटप करणारी गाडी पकडली असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ हा सर्व प्रकार घडला असून गाडीमध्ये एकूण तीन बॅग होत्या.
दोन बॅग गाडीतील इतर लोक घेऊन पळाले, एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असून गाडीत संशयित पकडलेला व्यक्ती राहुल नार्वेकरांशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Summary
शिंदेंच्या शिवसैनिकांनी संशयित पैसे वाटप करणारी गाडी पकडली
मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळील प्रकार
गाडीमध्ये एकूण तीन बॅग होत्या
