Aaditya Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईत मेळावा; आदित्य ठाकरे करणार मेळाव्याला संबोधित
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray ) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे, मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यातच आता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा उद्या मुंबईत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आज संध्याकाळी 6 वाजता वरळी डोमला हा मेळावा पार पडणार असून 'मुंबईच्या भविष्यासाठी ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया! असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्वाचा मानला जात असून आजपर्यंत ठाकरे गटाकडून करण्यात आलेली कामे आणि इतर कामांची माहिती या मेळाव्यातून देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार असून या मेळाव्याला मुंबईचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात काय मार्गदर्शन केलं जातंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summery
ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईत मेळावा
मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा वरळी डोमला मेळावा
संध्याकाळी 6 वाजता होणार मेळाव्याला सुरुवात
