Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेची पोलीस ठाण्यांसह बस आगारांना नोटीसा; पावसाळ्यातील आजार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो, याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Thane Municipal Corporation) पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो, याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पोलीस ठाण्यांच्या आवारात आणि एसटी बस आगारांमध्ये अनेक अपघातग्रस्त व जप्त वाहने वर्षानुवर्षे उभी आहेत. यातील टायरांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढते.

महापालिकेने नौपाडा, मानपाडा, मुंब्रा, कळवा, वर्तकनगर, चितळसर मानपाडा, डायघर, उथळसर, वागळे आणि कासारवडवली पोलीस ठाण्यांना तसेच वागळे, खोपट, वंदना, कोपरी, आनंदनगर व ठाणे एसटी बस आगारांना नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीसांद्वारे भंगार वाहनांमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याशिवाय, मेट्रो कारशेड, कचरा हस्तांतरण केंद्र, नर्सरी, टायर दुकाने आणि भंगारवाले यांनाही खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. दरवर्षी पालिकेकडून वाहन टायर पंक्चर दुकाने व बांधकाम प्रकल्पांनाही नोटीसा देण्यात येतात. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांनी घरांच्या छतावर टायर, नारळ करवंट्या, रिकामे डबे साठवू नयेत, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com