मुंबई
Mumbai : मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली; वांद्रे, कलानगर भागात मात्र पाणीटंचाई
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी मात्र काही ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी मात्र काही ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. वांद्रे, कलानगरबरोबरच, पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ, गोरेगाव, दिंडोशी, गोराई परिसरातही नागरिक पाणीटंचाईने हैराण झालेत.
अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, काही भागात नळाला पाणीच येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शहरातील शिवडी प्रभाग क्रमांक 206 मध्ये पाणीटंचाई असल्याचं समोर आलं आहे. अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करूनही पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याची माहिती मिळत आहे. अनेक सोसायट्यांसमोर पाणीटंचाईची समस्या आहे.