11th Admission : इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरु! विद्यार्थ्यांची पहिल्या दिवशी लाखोंच्या संख्येत नोंदणी

11th Admission : इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरु! विद्यार्थ्यांची पहिल्या दिवशी लाखोंच्या संख्येत नोंदणी

सोमवार 26 मे 2025 ला सकाळी 10 वाजता 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी 2 लाख 58 हजार 887 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

19 मेपासून 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात येणार होती. मात्र, पहिल्याच दिवशी संकेतस्थळ तांत्रिक अडचणींमुळे कोलमडल्याने शिक्षण विभागाला वेगळे वेळापत्रक जाहीर करण्याची गरज पडली. नोंदणी संकेतस्थळाला आलेल्या अडचणी दूर करून सोमवार 26 मे 2025 ला सकाळी 10 वाजता 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली.

यादरम्यान पहिल्याच दिवशी 2 लाख 58 हजार 887 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती शिक्षण संचालक तथा अध्यक्ष, राज्यस्तर प्रवेश संनियंत्रण समिती यांनी दिली. दरम्यान 83 हजार 724 विद्यार्थ्यांनी 11 वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पाडली तसेच फी देखील भरली. मात्र सकाळी 11 वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर अर्ज भरण्यात अडथळा निर्माण झाला होता.

यादरम्यान महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची तपासणी योग्यरित्या व्हावी यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 5 जून 2025 रोजी तात्पुरती सर्वसाधारण प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावर मार्गदर्शन व मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती माहिती ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहे. तसेच ज्यांना प्रथम फेरीत प्रवेश मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी असेल.

11 वी प्रवेश केलेल्या 2 लाख 58 हजार 887 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतून सर्वाधिक 37 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्याचसोबत गडचिरोलीमधून सर्वात कमी 519 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर ठाण्याील 26 हजार 586 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच पुण्यातून 25 हजार 39, पालघरमधून 10 हजार 656, अहिल्यानगरमधून 7 हजार 797 आणि नाशिकमधून 7 हजार 83 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com