Mumbai Pollution : प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर; मुंबईतील हवा प्रदूषितच
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Mumbai Pollution ) मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून वायुप्रदूषणाचे प्रमाणही झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. थंडीची चाहूल लागली असतानाच त्यासोबत मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे. मुंबईत वाढत्या धुके, धूळ आणि वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अतिशय वाईट पातळीवर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील हवा प्रदूषितच असून चेंबूरचा निर्देशांक वाईट श्रेणीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
समीर अॅपनुसार हा निर्देशांक शुक्रवारी 125 वर होता. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईतील हवेत घट झाली असून निर्देशांक सरासरी प्रमाणे मध्यम श्रेणीत स्थिरावला आहे. समीर ॲपनुसार बहुतांश ठिकाणी मध्यम श्रेणीत हवेची नोंद झाली. कुर्ला संकुल येथील हवा निर्देशांक 142, अंधेरी 114, कांदिवली 127,कुर्ला 118 होता. केवळ घाटकोपर आणि विले पार्ले भागातील हवा समाधानकारक नोंदवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
मुंबईतील हवा प्रदूषितच
चेंबूरचा निर्देशांक वाईट श्रेणीत
समीर ऍप नुसार हा निर्देशांक शुक्रवारी 125 वर होता
