Rainforest Challenge India
मुंबई
Rainforest Challenge India : गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत सिरीलने '४बाय ४ मॉडिफाइल्ड' विभागात पटकावला दुसरा क्रमांक
गोव्यातील काऊगर मोटरस्पोर्टस या संस्थेकडून या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन दरवर्षी गोवा येथे करण्यात येते.
विरार पश्चिमेच्या नंदाखाल येथील रहिवासी असलेल्या सिरील वेलेरियन डिमेलो याने गोवा येथे पार पडलेल्या 'रेनफॉरेस्ट चॅलेंज इंडिया' या राष्ट्रीय स्पर्धेत '४बाय ४ मॉडिफाइल्ड' या विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
गोव्यातील काऊगर मोटरस्पोर्टस या संस्थेकडून या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन दरवर्षी गोवा येथे करण्यात येते. यातील ४वाय४ मॉडिफिल्ड या विभागात सिरील याने 2 हजारांपैकी एकूण 1 हजार 605 गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला असून ही स्पर्धा आव्हानात्मक मानली जाते.