Mumbai Local : पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांचा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा!
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Local) पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे 288 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कांदिवली बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गाच्या कामासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकमुळे शेकडो लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. दोन दिवस ब्लॉक असल्याने या दिवशी लोकलच्या फेऱ्या कमी असणार आहेत. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली -मालाड स्थानकांदरम्यान पॉइंट 103 तोडण्यासाठी मंगळवारी रात्री मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हा ब्लॉक अप जलद मार्गावर मध्यरात्री 12 ते पहाटे 5.30 आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 दरम्यान असणार आहे.
Summary
पश्चिम रेल्वेवरील कांदिवली बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गाच्या कामासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक
या ब्लॉकमुळे 288 लोकल फेऱ्या रद्द
ब्लॉकमुळे शेकडो लोकल सेवा रद्द
