Bandra : वांद्रे येथील धक्कादायक घटना; सिग्नलवर थांबलेल्या रिक्षात चढून तरुणीचा विनयभंग
(Bandra) मुंबईच्या वांद्रे येथे धक्कादायक घटना घडली आहे. सिग्नलवर थांबलेल्या रिक्षात चढून तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. रिक्षा सिग्नलला थांबली असताना आरोपी रिक्षात शिरला आणि चालकाला शस्त्राचा धाक दाखवून तरूणीचा विनयभंग केला.तरुणी रोज दुपारी 12 वाजता कॉलेजला रिक्षाने जाते.
सोमवारी तिने नेहमीप्रमाणे रिक्षा पकडली आणि रिक्षा सिग्नलवर थांबली असताना याच वेळी एक तरुण त्या रिक्षात येऊन बसला. रिक्षाचालक आणि तरुणीने त्याला रिक्षातून उतरण्यास सांगितलं, मात्र तरुणाने रिक्षा चालकाला चाकूचा धाक दाखवत रिक्षा चालू ठेवण्यास सांगितले. त्यानंतर पुढच्या सिग्नल येईपर्यंत तरुणीकडे बघत त्याने अश्लील शेरेबाजी करत तिचा विनयभंग केला.
पुढच्या सिग्नलवर रिक्षा थांबताच हा तरुण रिक्षातून उतरल्यावर आणि पसार झाला. या सर्व घडलेला प्रकार तरुणीने घरी सांगितला आणि पोलीस स्थानकात धाव घेतली. सध्या पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी पथकं तैनात केली असल्याची माहिती मिळत असून या परिसरातील CCTV कॅमेरे देखील तपासण्यात येत आहेत. वांद्रे पोलिसांनी एका संशियाताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.