Mumbai Water Supply : पाणी जपून वापरा; मुंबईत आजपासून 3 दिवस पाणीकपात
थोडक्यात
मुंबईत आजपासून 3 दिवस पाणीकपातीची शक्यता
सलग 3 दिवस पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता
जलशुद्धीकरण केंद्रात मीटर बसवण्याचं काम सुरू
(Mumbai Water Supply :) मुंबईत आजपासून 3 दिवस पाणीकपात करण्यात येणार आहे. आज 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर २०२५ असे तीन दिवस 10 टक्के पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील 100 किलोव्हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे हा पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहर विभागातील ए, बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात तसेच, पूर्व उपनगरांतील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात संपूर्ण परिसरात 10 टक्के पाणी कपात लागू केली जाणार असून पूर्व उपनगरांतील एल विभाग (कुर्ला पूर्व), एन विभागात विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागाात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रात पाणी कपात लागू असणार आहे.
यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.