Mumbai Water Supply
मुंबई
Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद
नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे पालिकेकडून आवाहन
थोडक्यात
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा
2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद
नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे पालिकेकडून आवाहन
(Mumbai Water Supply ) मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. जुन्या जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व बदलाची कामे सुरू करणार असल्याने हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार, 14 नोव्हेंबर सकाळी 10 वाजल्यापासून ते शनिवार, 15 नोव्हेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
घाटकोपर, कुर्ला, चेंबूर आणि माटुंगा परिसर प्रभावित असणार असून 1200 मि.मी. तानसा आणि 800 मि.मी. विहार ट्रॅक जलवाहिनीवरील कामे सुरू आहेत.
एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर विभागांमध्ये पूर्ण पाणी बंद राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आला आहे.
