India
Watch Video; संतप्त नागरिकाने थेट राष्ट्राध्यक्षांच्याच लगावली कानशिलात
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी फ्रान्सच्या उत्तर-पश्चिम भागांच्या दौर्यावर गेले असताना एका व्यक्तीने थेट कानशिलात लगावल्याची घटना घडली. या प्रकरणी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन जणांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
इमॅन्युएल मॅक्रॉन अनेक नागरिकांकडून शुभेच्छा स्वीकारत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर हात उगारला. त्यामुळे एकच धांदल उडाली होती. दरम्यान, सुरक्षा कर्मचार्यांनी रेलिंगजवळ येऊन हल्लेखोराला पकडले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन जणांना अटक केली आहे. फ्रेंच पोलिसांचे म्हणणे आहे की, पोलीस या दोघांची चौकशी करत आहेत आणि हल्ल्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.