Raj Thackeray
Vidhansabha Election
उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
थोडक्यात
उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार
जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या गोष्टी असतील हे पाहणं महत्वाचे
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
उद्या मनसेच्या जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या गोष्टी असतील, कोणत्या मुद्द्यांचा समावेश असेल हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.