‘मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा’; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

‘मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा’; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

अब्दुल सत्तार यांचा मला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्यासाठी सिंहाचा वाटा असल्याचे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. जलील यांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी महाविकासआघाडी सोबत येण्याचं विधान केलं होतं. जलील यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यानंतर सत्तार यांच्याबद्दल केलेल्या या विधानानंतर पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यात असलेल्या खंडाळा येथे शनिवारी एका कार्यक्रमात सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते. यादरम्यान, इम्तियाज जलील यांनी हे विधान करत अब्दुल सत्तारांचं जाहीर कौतुक केलं आहे.

 इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले? :
● लोकसभेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांची मदत मला मिळाली आणि माझ्या विजयी होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे औरंगाबादचे किंगमेकर असल्याचं देखील जलील यांनी म्हटलं आहे. आम्ही भलेही दोन वेगवेगळ्या पक्षात असोत पण आमची मैत्री खूपच चांगली आहे.
● इम्तियाज जलील यांनी भर कार्यक्रमात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचं कौतुक केलं आहे. राजकारणात अब्दुल सत्तार यांची कृपा झाली तर त्या व्यक्तीचं भाग्य उजळतं आणि ते जर नाराज झाले तर त्या व्यक्तीची अधोगती सुरू होते. असंही जलील यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com