वाहनचालकांसाठी मोठी बातमी; नियम मोडणाऱ्यांना सात ते आठपट दंड

वाहनचालकांसाठी मोठी बातमी; नियम मोडणाऱ्यांना सात ते आठपट दंड

Published by :
Published on

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. कारण जर तुम्ही नियमांचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास तुम्हाला आठ ते दहा पट अधिक दंड भरावा लागणार आहे. चला तर मग पाहूयात कुठले नियम मोडल्यावर किती दंड भरावा लागणार आहे.

केंद्राकडून वाहतुकीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार जर तुम्ही नियमांचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास तुम्हाला आठ ते दहा पट अधिक दंड भरावा लागणार आहे. रविवारी मध्यरात्रीपासून नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याने, वाहनचालक नियमांचे उल्लंघ करणे टाळतील आणि अपघाताला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उंल्लघन केल्यास पूर्वी 200 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. सुधारीत नियमानुसार तुम्ही जर पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केले तर पहिल्या वेळेस 500 रुपये तर दुसऱ्या वेळेस 1500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

परवाना नसताना वाहन चालवल्यास आता तुम्हाला तब्बल 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पूर्वी परवाना नसताना वाहन चालवण्यासाठी केवळ 500 रुपयांची तरतूद होती. जर तुमच्याकडे वाहनांचे अधिकृत कागदपत्रे नसतील तर तुमच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र आता ही रक्कम वाढून 5 हजार इतकी करण्यात आली आहे. कारण नसताना हॉर्न वाजवल्यास पूर्वी 200 रुपयांचा दंड होता. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता विनाकारण हॉर्न वाजल्यास पहिल्यावेळी पाचशे तर दुसऱ्यावेळी तब्बल 1500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. जर तुम्ही विनाहेल्मेट गाडी चालवताना आढळल्यास पहिल्यावेळेस 500 रुपयांचा तर दुसऱ्या वेळेला दीड हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. पूर्वी दंडाची ही रक्कम केवळ 500 रुपये इतकी होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com