खासदार नवनीत राणा यांना अ‌ॅसिड हल्ल्याची धमकी

खासदार नवनीत राणा यांना अ‌ॅसिड हल्ल्याची धमकी

Published by :
Published on

सुरज दहाट : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अ‌ॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या कथित लेटरहेडवरुन त्यांना हे धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता नवनीत राणा यांनी दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नवनीत राणा यांना वसेनेच्या कथित लेटरहेडवरुन धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात त्यांच्यावर अ‌ॅसीड फेकण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या पत्रात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचे नाव नाही. तसेच, हे पत्र शिवसेनेच्या खऱ्या लेटरहेडवर असल्याची कोणतीही पुष्टी अजून झालेली नाही.

या प्रकरणी नवनीत राणा यांनी शिवसेनेनं धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी हे धमकीचे पत्र शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पाठविण्यात आल्याचा दावा केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com