श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; महाराष्ट्राच्या एकसष्ठीनिमित्त सांगितिक परंपरेचा वेध

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; महाराष्ट्राच्या एकसष्ठीनिमित्त सांगितिक परंपरेचा वेध

Published by :
Published on

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव उत्साहात सूरू आहे. या उत्सवाला गणेशभक्तांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राच्या एकसष्ठीनिमित्त सांगितिक परंपरेचा वेध घेतला जाणार आहे. हा कार्यक्रम लोकशाही न्यूजवर Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या www.bhaurangari.com संकेतस्थळावर रात्री ८ वाजता पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या एकसष्ठीनिमित्त महाराष्ट्राच्या सांगितिक परंपरेचा वेध घेतला जाणार आहे. भूपाळीपासून पोवाड्यापर्यत आणि गणगवळणीपासून भारूडापर्यत वैविध्यपुर्ण गाण्याची पर्वणी असणार आहे. अंजली मराठे, जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी, स्वरदा गोडबोले आदी या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आहेत. यंदा या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. हा महोत्सव 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान असाच सूरू राहणार आहे. ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांना समर्पित स्वरवंदना देण्यासाठी राकेश चौरासिया, अमर ओक, निलेश देशपांडे आणि वरद कठापूरकर यांचा 'हरि–प्रसाद', हृषिकेश रानडे, प्रियांका बर्वे, विश्वजित बोरवणकर, आनंदी जोशी यांचा कार्यक्रम लोकशाही न्यूजवर Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या www.bhaurangari.com संकेतस्थळावर रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन महोत्सवाचा गणेशभक्तांनी मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन लोकशाही न्यूज यानिमित्त करत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com