MVA Seat Sharing: मविआमध्ये 23 जागांचा तिढा कायम
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारिख 29 ऑक्टोबर आहे. महायुती आणि मविआतील घटक पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. मात्र, अद्यापही काही जागांवरून दोन्ही आघाड्यांमध्ये घोळ असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरूच आहेत. मात्र, काही जागांविषयी तोडगा निघाला नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास दुणावलेल्या मविआच्या नेत्यांनी विधानसभेच मैदान आम्हीच मारणार हे अगदी छातीठोकपणे सांगायला सुरूवात केली. तर दुसरीकडे मैदानात उतरण्यासाठी उमेदवारच ठरत नसल्यानं मैदान कोण आणि कसं मारणार हा प्रश्नच आहे. मविआ पुढे 23 जागांचा पेच कायम आहे. मविआकडून अद्याप 23 मतदारसंघांबाबत कोणताही निर्णय समोर आला नाही. मात्र, याबाबत विचार करायला मविआकडे फक्त आज रात्रीचा वेळ आहे. कारण उद्या(मंगळवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
कोणते मतदारसंघ अजून कोरडे?
१. सिंदखेडा
२. शिरपूर
३. अकोला पश्चिम
४. दर्यापूर
५. वरूड-मोर्शी
६. पुसद
७. पैठण
८. बोरिवली
९. मुलुंड
१०. मलबार हिल
११. कुलाबा
१२. खेड आळंदी
१३. दौंड
१४. मावळ
१५. कोथरूड
१६. औसा
१७. उमरगा
१८. माढा
१९. वाई
२०. माण
२१. सातारा
२२. मिरज
२३. खानापूर
दरम्यान, मविआचाच्या जागावाटपासंदर्भात तिढा सोडवण्यासाठी कधी चर्चेच केंद्र मातोश्री असंत तर कधी सिल्व्हर ओक तर कधी थेट दिल्ली पण गंमत अशी केवळ स्थळच बदलताना दिसत आहेत. मात्र, परिस्थिती जैसै थे असल्यामुळे 'गल्लीत गोंधळा...' अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.