नारायण राणे यांचा जबाब ऑनलाइन नोंदविणार

नारायण राणे यांचा जबाब ऑनलाइन नोंदविणार

Published by :
Published on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात राणे यांचा जबाब नाशिक पोलिस येत्या 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार आहेत. याबबतची माहिती पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली.

नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी नाशिक पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. राणे यांच्याविरोधात शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राणे यांना अटक झाली.

अटकेनंतर महाड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हजर करण्यात आले होते. राणे यांना दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 17 सप्टेंबर पर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश राज्य सरकारला दिले होते. यापूर्वी गणेशोत्सव असल्यामुळे 2 सप्टेंबर रोजी उपस्थित राहता येणार नसल्याचे पत्र राणे यांच्या वकिलांनी नाशिक पोलिसांना पाठविले होते. नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वकिलांशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी, 25 सप्टेंबर रोजी राणे यांचा ऑनलाइन जबाब नोंदविला जाणार असल्याची माहिती दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com