Ajit Pawar LIVE
Ajit Pawar LIVE

Ajit Pawar: मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले अजित पवार?

दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीत निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. मात्र, महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अद्यापही पेच कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदावरील आपला दावा सोडला आहे. तर आज राष्ट्रवादी काँग्रेचसे नेते अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेत महत्त्वाची घोषणा केली आहे.

दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले अजित पवार?

निवडणुकीआधी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाल्याचं महत्त्वाचं विधान अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार यांनी निवडणुकीत महायुतीला निवडून आणल्याबद्दल जनतेचे आभार मानले. इव्हिएम घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांना सुनावलं. लोकसभा निवडणुकीवेळी ईव्हिएम व्यवस्थित होतं. आता विरोधकांना विधानसभेत अपयश मिळाल्यानंतर ते पराभवाचे खापर ईव्हिएमवर फोडत आहेत. विरोधकांच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन लवकरच होणार असल्याची माहिती दिली. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील रणनिती ठरवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करू.

  • विरोधक पराभवाचे खापर ईव्हिएमवर फोडत आहेत.

  • राष्ट्रीय अधिवेशनात पुढील रणनिती ठरवू.

विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी लिटमस टेस्ट होती. निवडणूक निकालामध्ये दोन्ही पक्षांच्या फुटीनंतर सिद्ध करणं महत्त्वाचं होतं. अखेर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर उमेदवारांनी जिंकून येत जनतेचा कौल मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने ४१ जागांवर विजय मिळवला आहे.

अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com