Headline
अकोल्यात वाहतूकीसाठी नवी नियमावली
अमोल नांदुरकर | अकोला शहरातील वाढत्या ट्राफिकमुळे काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातच उद्यापासून (सोमवार) अकोल्यात ट्राफिक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.
अकोला शहरातील धिंग्रा चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांना गुलाबाचे पुष्प देऊन, वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गांधीगिरी केली. गाडीचे कागदपत्र सोबत न बाळगणे , ऑटो धारकांना ड्रेस कोड लागू असल्यावर सुद्धा ड्रेस न घालणे ,दुचाकी वाहनावर ट्रिपल सीट घेऊन जाणे , गाडीवर नंबर प्लेट नसणे अशी वागणूक करणाऱ्या वाहनधारकांना या वेळी गुलाबाचे पुष्प देण्यात आले तसेच उद्या पासून सुरु होणाऱ्या मोहिमेची सूचना सुद्धा वाहतूक नियंत्रण शाखेकडून त्यांना माहिती देण्यात आली.

