Karti Chidambaram: पी चिदंबरम यांच्या मुलाची 11 कोटीची संपत्ती ईडीकडून जप्त
Admin

Karti Chidambaram: पी चिदंबरम यांच्या मुलाची 11 कोटीची संपत्ती ईडीकडून जप्त

पी चिदंबरम यांच्या मुलाची ११ कोटीची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पी चिदंबरम यांच्या मुलाची ११ कोटीची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. कार्ती चिदंबरम हे तामिळनाडूमधील शिवगंगई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार आहेत.माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांची ११ कोटी संपत्ती जप्त करत ईडीने मोठी कारवाई केली आहे.

आयएनएक्स प्रकरणात त्यांना ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने अटक केली होती. तसेच आयएनएक्स मीडियामध्ये 2007 साली 300 कोटींची परकीय गुंतवणूक गैरपद्धतीने आणण्यासाठी कार्ती यांनी साडेतीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कार्ती यांच्या विरोधात प्रोव्हिजनल ऑर्डर जारी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com