Sushma Andhare : सावरीमधील 115 कोटींचं ड्रग्ज प्रकरण, 'शंभूराज देसाई गप्प का?', अंधारेंचा सवाल

सातारा जिल्ह्यातील सावरी परिसरात उघडकीस आलेल्या कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.
Published by :
Riddhi Vanne

सातारा जिल्ह्यातील सावरी परिसरात उघडकीस आलेल्या कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाला जवळपास महिना उलटून गेला असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत त्यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई, पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या सगळ्या प्रकरणात पालकमंत्री शंभुराज देसाई पूर्णपणे गप्प असल्याचा आरोप करत सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला.

“जे लोक सतत केसेस आणि कारवाईची भाषा करतात, तेच शंभुराज देसाई आज कुठल्या बिळात लपले आहेत? पालकमंत्री म्हणून त्यांची भूमिका शून्य आहे. म्हणूनच मी त्यांना ‘ढ’ पालकमंत्री म्हटलं,” असे अंधारे म्हणाल्या आहेत.

थोडक्यात

  • साताऱ्यातील सावरी ड्रग्ज प्रकरणावर सुषमा अंधारे पुन्हा कडाडल्या

  • “115 कोटींचं ड्रग सापडलं तरी कारवाई नाही; शंभुराज देसाई गप्प का?”

  • “शंभुराज देसाई पालकमंत्री म्हणून ढ” सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com