11th Admission Process : 11 वी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, 'या' आहेत महत्त्वाच्या तारखा
11 वी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. (Maharashtra Board 11th Admission Process) विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अकरावी प्रवेश अर्जाचा भाग-1 भरायचा आहे. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा चा भाग-2 भरायचा आहे.
दहावी परीक्षेचा निकाल (ssc result) जाहीर झाल्यानंतर भाग-2 भरून त्यानंतर दरवर्षी प्रमाणे तीन नियमित फेऱ्या होतील. त्यानंतर एक विशेष फेरी होईल. या चारही फेऱ्यांमध्ये जर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर प्रतिक्षा यादी (Waiting list ) जाहीर करण्यात येणार आहे.
संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून 1 मे ते 14 मे दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. तर 17 मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरायचा आहे.
मुंबई ,पुणे ,नागपूर, पिंपरी-चिंचवड नाशिक, अमरावती ,औरंगाबाद याठिकाणी अकरावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
पाहा अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक
*1 मे ते 14 मे - विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन अर्ज भाग- एक भरण्याचा सराव करणे
*17 मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत - अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रवेश व्हेरीफाय करणे
* दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाच दिवस - अकरावी प्रवेशाचा भाग-2 भरणे, महाविद्यालयाचे पसंतीचा क्रमांक भरणे
* नियमित फेरी 1 - 10 ते 15 दिवस
*नियमित फेरी 2 - 7 ते 9 दिवस
* नियमित फेरी 3 - 7 ते 9 दिवस
*विशेष फेरी - 7 ते 8 दिवस