Gadchiroli News : पोलीस मुख्यालयातील सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 12  माओवाद्यांचे आत्मसमर्पण

Gadchiroli News : पोलीस मुख्यालयातील सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 12 माओवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आज, शुक्रवारी 12 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
Published by :
Team Lokshahi
Published on

गडचिरोली पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आज, शुक्रवारी 12 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यावेळी त्यांनी माओवादविरोधी पथकाचा सत्कार केला आणि सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रानटी हत्ती, वाघ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर यावेळी चर्चा ही करण्यात आली. माओवादविरोधी लढाई आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे सूचक वक्तव्य यावेळी मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 6 जून रोजी ते गडचिरोली दौऱ्यावर आले होते. यावेळी पोलीस मुख्यालयात 13 आत्मसमर्पित जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला.

गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माओवादविरोधी पोलीस पथकातील जवानांचा सत्कार करण्यात आला. कवंडे पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चकमकीत चार माओवाद्यांना मारण्यात यश आले होते. या माओवादविरोधी पोलीस पथकाने केलेल्या या कामगिरीबद्दल हा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश, विशाल नागरगुजे यांच्यासह 17 पोलीस जवानांचा यात समावेश होता. गेल्या तीन-चार वर्षांत नक्षल चळवळीला आळा घालण्यात माओवादविरोधी पोलीस पथकाने मोठी यशस्वी कामगिरी केली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस मुख्यालयात 12 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये नक्षल चळवळीत डीव्हीसीएम (DVCM) पदावर कार्यरत असलेल्या अंजू आणि सरिता या दोन महिला माओवाद्यांनी एके-47 (AK-47) रायफलसह आत्मसमर्पण केले. आता ही एक वैचारिक लढाई राहिलेली नाही, त्यामुळे अनेक माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचे यावेळी मुख्यामंत्री म्हणाले. आता बोटावर मोजण्या इतके नक्षलवादी राहिले असून लवकरच गडचिरोली जिल्हा माओवादीमुक्त जिल्हा होईल यात शंका नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आत्मसमर्पण केलेल्या सर्व माओवाद्यांना संविधान भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचा लग्नसोहळा देखील पोलीस अधीक्षक कार्यालयात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शाहिद पांडू आलाम सभागृहात हा लग्नसोहळा पार पडला. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना मुख्यमंत्र्यांकडून भेटवस्तूही देण्यात आल्या. आत्मसमर्पण योजनेतून अनेक माओवाद्यांना नोकरी देण्याचे काम हे महाराष्ट्र राज्य सरकार आणि लॉइड मेटल कंपनी करत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा मुद्दा, वाघाची दहशत आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान अशा अनेक गोष्टीवर समग्र चर्चा करण्यात आली. तेथील नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. त्याच्याशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

हेही वाचा

Gadchiroli News : पोलीस मुख्यालयातील सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 12  माओवाद्यांचे आत्मसमर्पण
Sunil Tatkare : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगून टाकलं
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com