कृष्णेतील मासे मृत्यू प्रकरणी तीन साखर कारखान्यासह 12 जणांना प्रतिवादी करण्याचे हरित न्यायालयाचे आदेश

कृष्णेतील मासे मृत्यू प्रकरणी तीन साखर कारखान्यासह 12 जणांना प्रतिवादी करण्याचे हरित न्यायालयाचे आदेश

ऐन पावसाळ्यामध्ये सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये लाखो मासे मृत्यू मृत्युमुखी झाल्याचा प्रकार घडला होता.

संजय देसाई, सांगली

ऐन पावसाळ्यामध्ये सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये लाखो मासे मृत्यू मृत्युमुखी झाल्याचा प्रकार घडला होता. याबाबत प्रदूषण महामंडळाकडून माशांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं,तर नदीत सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे माश्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या प्रकरणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी हरित न्यायालयामध्ये धाव घेतली होती.

जिल्ह्यातल्या कृष्णाकाठी असणारे साखर कारखाने, नगरपालिका आणि सांगली महानगरपालिका यांच्या प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू होत,असल्याची बाब समोर आणत याचीका दाखल केली होती.या प्रकरणी आता हरित न्यायालयामध्ये याचिकेवरून न्यायालयाने जिल्ह्यातले कृष्णा काठचे तीन साखर कारखाने, नगरपालिका,सांगली महानगरपालिका अशा बारा जणांना प्रतिवादी करण्याच्या आदेश जारी केले आहेत,अशी माहिती याचिकाकर्ते सुनील फराटे यांनी दिली आहे,त्याचबरोबर प्रदूषण महामंडळाचे अधिकारी नवनाथ अवताडे यांनी मासे मृत्यू प्रकरणी खोटी माहिती दिल्याने त्यांचे निलंबन करावं,अशी मागणी ही सुनील फराटे यांनी केली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com