बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आजपासून बारावीच्या परीक्षा सुरु होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सचिन बडे, औरंगाबाद

आजपासून बारावीच्या परीक्षा सुरु होत आहे. यातच औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. औरंगाबादमध्ये बारावीच्या परीक्षेच्या आधी विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. अमन रवींद्र आहेरेवाल असे अठरा वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. परीक्षेच्या तणावातूनच आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

सिडको पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अभ्यासाच्या खोलीत गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. रविवारी सायंकाळी जेवण केल्यानंतर अमन आपल्या तिसऱ्या मजल्यावरील अभ्यासाच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. मात्र तो सोमवारी सकाळी खाली आलाच नाही. दुपारी जेवणासाठी आजोबा अमनला बोलावण्यासाठी गेले असता, अमनने आत्महत्या केल्याचे समजले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com