या राज्यात गणेश विसर्जन करताना 13 जण बुडाले

या राज्यात गणेश विसर्जन करताना 13 जण बुडाले

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते.सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करताना 4 भावंडांसह 7 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हरियाणातील महेंग्रगड जिल्ह्यात कालव्यामध्ये बुडून चार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

उत्तर प्रदेशमधील उन्नाव व संत कबीर नगरमध्ये 7 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घेटनेत चार लहान मुलांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रासह हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्यातून गणेश विसर्जन करताना चार बालकांसह 11 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर काही भक्तांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com