पुणे जिल्ह्यातील 13 अनधिकृत शाळा बंद

पुणे जिल्ह्यातील 13 अनधिकृत शाळा बंद

राज्य सरकारची परवानगी न घेता पुणे जिल्ह्यात १३ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळून आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्य सरकारची परवानगी न घेता पुणे जिल्ह्यात १३ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळून आले आहे.पुणे जिल्ह्यात ४३ अनधिकृत शाळा असल्याचं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला आढळलं होतं. त्यापैकी १३ शाळांच्या व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते.त्यापूर्वीही ४३ अनधिकृत शाळा उघडकीस आल्या होत्या. त्यातील काही शाळांना दंड ठोठावला होता. त्यानंतरही काही अनधिकृत शाळा सुरू असल्याचे दिसून आले.

बंद करण्यात येणाऱ्या ३० शाळांपैकी काही शाळा त्यांच्या अधिकृत पत्यावर भरत नव्हत्या.जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या १३ अनधिकृत शाळा बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. परिणामी, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे जवळच्या अन्य शाळांमध्ये त्यांचे समायोजन करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.

या इंग्रजी माध्यमाच्या अनधिकृत शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई करणार आहे, तसेच त्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्कही शाळांना परत करावे लागणार आहे, असेही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com