Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar : लिफ्टमध्ये अडकल्याने 13 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना

Chhatrapati Sambhaji Nagar : लिफ्टमध्ये अडकल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : सचिन बडे | छत्रपती संभाजीनगर शहरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खेळता खेळता अचानक दरवाजा बंद होऊन 13 वर्षांच्या मुलाचा लिफ्टच्या गेटमध्ये अडकून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक दुर्घटना घडली आहे. साकीब सिद्दिकी इरफान सिद्दिकी असे मृत मुलाचे नाव आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साकीबच्या वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त त्याचे आई-वडील नुकतेच हैदराबादला गेले होते. त्यामुळे साकीबचा सांभाळ करण्यासाठी त्याला कटकट गेट भागातील हयात हॉस्पिटलजवळील इमारतीत राहणाऱ्या आजी-आजोबांकडे ठेवले होते.रविवारी रात्री साडेनऊ वाजता साकीब तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना तो लिफ्टमध्ये गेला. त्यातच खेळता-खेळता लिफ्ट सुरू केली. परंतु, दरवाजा बंद झाला आणि बाहेर पाहताना त्याचा गळाच दरवाजात अडकला गेला. घटनेनंतर जोरात आवाज झाला.या दुर्देवी घटनेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारी यांना सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर साकीबचा मृतदेह घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात पाठवण्यात आला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com