रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रविकांत तुपकरांना काल बुलढाण्याहून अकोला कारागृहात हलविण्यात आले आहे. अकोला कारागृहात तुपकरांसह 25 सहकाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी तुपकरांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

हजार शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावर उतरत आहोत. सरकारने वेळोवेळी आमच्यासोबत चर्चा, बैठका केल्या. सरकारने आम्हाला आश्वासनं दिली, त्यांनी आमची फसवणूक केली आहे. कापसाला, सोयाबीनला दरवाढ मिळत नाही. 70 ते 80 टक्के सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. तरीही सरकार चर्चा करायला तयार नसल्याचं तुपकरांनी सांगितले आहे. 

तुपकरांसह त्यांच्या 25 सहकाऱ्यांनांही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान रविकांत तुपकरांनी तुरुगांतही अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपासून तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com