उस्मानाबादमध्ये उरुसात वळू उधळल्याने चेंगराचेंगरी; 14 भाविक जखमी
Admin

उस्मानाबादमध्ये उरुसात वळू उधळल्याने चेंगराचेंगरी; 14 भाविक जखमी

उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या उरुसाच्या धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या उरुसाच्या धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उरुसात वळू उधळल्यानं चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यात 14 भाविक जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी जवळपास 15 हजार भाविक उपस्थित होते.

पोलीस आणि वैद्यकीय पथक तात्काळ हजर झाल्यानं गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.सर्व जखमींवर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक वळू गर्दीत घुसल्यानं भाविक भयभीत झालेच, पण वळूही घाबरुन सैरावैरा पळू लागला. वळू उधळल्यानं सर्व भाविक भयभीत होऊन पळू लागले. गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या धार्मिक सोहळ्यानिमित्त उस्मानाबादमध्ये हा उरुस असतो. दोन ते तीन दिवस हा उरुस चालतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com