Mumbai Local Updates Team Lokshahi
बातम्या
हार्बर रेल्वेच्या 'या' स्थानकादरम्यान 14 तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक
जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील हा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी घेण्यात आला आहे. गोरेगावसाठी शेवटची लोकल GN 83 गोरेगाव लोकल असेल. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवारी रात्री 10.54 वाजता सुटेल.
वांद्रे ते गोरेगाव मार्गावर शनिवार 20 मे रोजी रात्री 11:55 वाजल्यापासून ते रविवार 21 मे दुपारी 01:55 वाजेपर्यंत असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी पहिली लोकल GN 48 असेल. ही लोकल गोरेगाव येथून रविवारी दुपारी 02:33 वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी शेवटची लोकल GN 86 असेल. ही लोकल गोरेगाव येथून शनिवारी रात्री 11:06 वाजता सुटेल.
त्यामुळे या स्थानकादरम्यान १४ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.