ताज्या बातम्या
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणात आतापर्यंत 14 जणांची चौकशी
अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.
अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सैफ अली खान यामध्ये जखमी झाला आणि सैफ अली खान आता लीलावती रुग्णालयात आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज मिळू शकतो.
याच पार्श्वभूमीवर सैफ अली खान हल्ला प्रकरणात आतापर्यंत 14 जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सैफच्या घरात काम करणारे, बिल्डिंगचे सुरक्षा रक्षक, घरात सामान द्यायला येणारे, नोकर या सर्वांची चौकशी करण्यात आली आहे.
तसेच पोलिसांनी या घटनेच्या दिवशी या सर्व व्यक्ती कुठे होत्या याची देखील माहिती घेण्यात आली असून त्या दिवशीचे या सर्व व्यक्तींचे फोन कॉल रेकॉर्ड या सगळ्याची माहिती घेण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.