लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 1400 कोटींची तरतूद मंजूर
लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी ही तरतूद करण्यात आल्याचं समजतं. महिलांना दिले जाणारा हफ्ता १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्याची तरतूद अद्याप तरी करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांना २१०० रुपयांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तर या तरतूदीसोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 3050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणी – 1500 कोटी रुपये, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी अर्थ सहाय्य म्हणून – 1212 कोटी, आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी – 514 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दर महा 1500 रुपये दिले जातात. राज्य सरकारनं जुलै ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंतचे पाच हप्त्यांचे 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये दिले गेले आहेत. आता महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासनं दिलं होतं. राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.