Maharashtra Government Staff Strike: छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द
Admin

Maharashtra Government Staff Strike: छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 18 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 18 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत.

याच पार्श्वभूमीवर संपावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सामान्य जनतेला चांगलाच फटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कर्मचारी देखील संपावर गेल्याने या रुग्णालयात रोज अनेक शस्त्रक्रिया पार पडत असतात. मात्र रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेल्याने मंगळवारी नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com