साखर आयुक्तालयाकडून कारवाई; 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा
साखर आयुक्तालयाने राज्यातील 15 साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस बजावली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 10, अहमदनगर जिल्ह्यातील 2, सातारा जिल्ह्यातील 2 आणि छत्रपती संभाजीनगरमधील 1 अशा एकूण 15 साखर कारखान्यांचा समावेश आहे.
थकबाकी वसुलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातात. जिल्हाधिकारी कारखान्यांना जप्तीची नोटीस काढतात. दिलेल्या मुदतीत संबंधित कारखान्यांनी जर थकबाकी भरली नाही, तर जिल्हाधिकारी जप्तीची कारवाई करण्यात येणार. संबंधित कारखान्यांकडून 246 कोटी 45 लाख रुपयांची थकबाकी आहे.
त्यामुळे आता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरलेल्या मुदतीत एफआरपी (फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस) रक्कम न दिल्यामुळे साखर आयुक्तालयाने राज्यातील 15 साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस बजावली आहे.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना.
सोलापूरमधील मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट, गोकुळ शुगर्स लि. धोत्री, लोकमंगल अॅग्रो इंड लि. बिबीदारफळ, लोकमंगल शुगर इथेनॉल अॅड को-जनरेशन इंड लि., भिमाशंकर शुगर मिल्स लि. पारगाव, जयहिंद शुगर्स प्रा. लि. आचेगाव, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा, सिद्धनाथ शुगर मिल्स लि. उत्तर सोलापूर, इंद्रेश्वर शुगर मिल्स प्रा. लि., धाराशिव शुगर लि. सांगोला
छत्रपती संभाजीनगरमधील सचिन घायाळ शुगर्स प्रा. लि., पैठण यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील स्वामी समर्थ शुगर अॅड अॅग्रो इंड लि. नेवासा आणि श्री गजानन महाराज शुगर संगमनेर.