Vande Mataram :  वंदे मातरम 150 वर्षे! शाळांत 7 नोव्हेंबरपर्यंत अनिवार्य गायन

Vande Mataram : वंदे मातरम 150 वर्षे! शाळांत 7 नोव्हेंबरपर्यंत अनिवार्य गायन

महाराष्ट्र सरकारने 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सर्व शाळांमध्ये 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत संपूर्णपणे आणि अनिवार्यपणे गाण्याचा आदेश दिला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • वंदे मातरम् गीताची १५०वी वर्षपूर्ती…

  • राज्यातील सर्वच शाळांमध्ये संपूर्ण गीताचे गायन !

  • ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत वंदे मातरम्

महाराष्ट्र सरकारने 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सर्व शाळांमध्ये 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत संपूर्णपणे आणि अनिवार्यपणे गाण्याचा आदेश दिला आहे. हे राष्ट्रगीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील आहे आणि त्याच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त हा उपक्रम राबवला जात आहे. राज्यातील शाळांमध्ये ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत वंदे मातरम् या गीताच्या सर्व कडव्यांचे गायन, गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त, शाळांमध्ये गीताच्या इतिहासावर आधारित प्रदर्शने आयोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या संदर्भातील सूचना शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अ. रा. कुलकर्णी यांनी शिक्षण आयुक्तांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील राजमाता जिजाबाई ट्रस्टतर्फे शिक्षण विभागाने पत्र देण्यात आले होते.

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित ‘वंदे मातरम्’ या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी तिथीनुसार म्हणजेच कार्तिक शुद्ध नवमीला, दैनंदिन वापरातील ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ०l७ नोव्हेंबर, २०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ या गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. वंदे मातरम् या गीताची पहिली दोनच कडवी राज्यातील शाळांमधून रोज गायिली जातात. मात्र, १५० वर्षपूर्तीचे औचित्याने ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीदरम्यान राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘संपूर्ण वंदे मातरम्’चे गायन होण्याबाबत, तसेच ‘वंदे मातरम्’ या गीताचा इतिहास सांगणारे प्रदर्शन शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत राज्यातील सर्व शाळांना सूचना देण्याबाबत शिक्षण आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com