Virar Building Collapsed Case : विरार इमारत दुर्घटनेत 5 जणांना अटक; वसई न्यायालयाने सुनावली कोठडी
26 ऑगस्ट रोजी रात्री 11.45 ला विरार पूर्व विजय नगर येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर झाले होते. या सर्व प्रकरणात सदोष मनुष्य वध आणि एम आर टी पी अंतर्गत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, तो क्राईम युनिट 3 कडे तो वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून जमीन मालक मयत असल्याने जमीन मालकाच्या 4 कुटुंबियांना अटक करण्यात आली आहे. त्यात शुभांगी भोईर (मुलगी), सुरेंद्र भोईर (शुभांगी चा पती), संध्या पाटील (मुलगी), मंगेश पाटील (संध्या चा पती) असे अटक करण्यात आलेल्या जमीन मालकांच्या वरसदाराची नाव आहेत.
विकासकाला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे. दरम्यान नितल साने अटक करण्यात आलेल्या विकासकाचे नाव आहे. त्याचसोबत जमीन मालकाच्या वारसदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.